देवगड येथे दत्त जयंती महोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:21 IST2020-12-31T04:21:58+5:302020-12-31T04:21:58+5:30
नेवासा : नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे आयोजित दत्तजयंती महोत्सवाची सांगता बुधवारी महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी ...

देवगड येथे दत्त जयंती महोत्सवाची सांगता
नेवासा : नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे आयोजित दत्तजयंती महोत्सवाची सांगता बुधवारी महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून करण्यात आली.
भास्करगिरी महाराज म्हणाले, श्रद्धा ही अशी आहे की, जी नष्ट करता येत नाही. श्रद्धेमुळेच भारतीय माणूस आज टिकून आहे. युवा पिढी ही देशाची रक्षक असून दूध हाच त्यांच्यासाठी सकस आहार आहे, असे सांगून त्यांनी दत्त महिमा व सद्गुरू किसनगिरी बाबांचे कार्य विशद केले.
यावेळी विदर्भातील सुपेकर महाराज, नारायण महाराज ससे, रामनाथ महाराज पवार, नामदेव कंधारकर, गिरीजीनाथ जाधव, बजरंग विधाते, रामजी विधाते, रवींद्र मुनोत, सीताराम (नाना) जाधव, जुम्मन तोडकर, माऊली महाराज, लक्ष्मण नांगरे, बाबासाहेब महाराज सातपुते, राम महाराज काळे, अंबादास फोलाने, ज्ञानदेव लोखंडे, नानासाहेब महाराज चावरे, कैलास बोडखे, किरणराव धुमाळ, सरपंच अजय साबळे, सुरक्षा अधिकारी बबनराव वरघुडे, लक्ष्मीकांत नांगरे, चांगदेव साबळे, महेंद्र फलटणे, संदीप साबळे आदींसह भाविक उपस्थित होते.