आश्रमशाळांतील २३ वर्ग बंद
By Admin | Updated: July 7, 2016 23:25 IST2016-07-07T23:18:59+5:302016-07-07T23:25:01+5:30
अकोले : आदिवासींसाठी शिक्षणाची कवाडे खुल्या करणाऱ्या आदिवासी उन्नती सेवा मंडळ या संस्थेने अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांमधील २३ वर्ग बंद करण्याचा निर्णय संबंधित सात आश्रमशाळांना कळविला

आश्रमशाळांतील २३ वर्ग बंद
अकोले : आदिवासींसाठी शिक्षणाची कवाडे खुल्या करणाऱ्या आदिवासी उन्नती सेवा मंडळ या संस्थेने अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांमधील २३ वर्ग बंद करण्याचा निर्णय संबंधित सात आश्रमशाळांना कळविला असून त्यानुसार कमी विद्यार्थी पटसंख्येच्या कारणास्तव १ जुलैला हे वर्ग बंद करण्यात आले आहेत.
१ जुलै २०१६ ला आदिवासी उन्नती सेवा मंडळाने तालुक्यातील मान्हेरे, खडकी, शेंडी, कोथळे, देवठाण,एकदरे,राजूर येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांतील २३ वर्ग बंद केले. पटसंख्या कमी असल्याने शासनाच्या निर्णयामुळे हे वर्ग बंद करण्यात आले आहेत.
या वर्गांमधील विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याची जबाबदारी संबंधित वर्ग शिक्षक व मुख्याध्यापकांवर सोपवण्यात आली आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे ३० पेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवता येणार नसल्याने व शासनाकडून भोजन अनुदान मिळणार नसल्याने हे वर्ग बंद करण्यात आले आहेत.
सात आश्रमशाळांमधील २९१ विद्यार्थ्यांचे इतर शाळांत समायोजन होईल व शिक्षणाचा प्रश्न काही अंशी मार्गी लागेल, पण जवळपास ५७ शिक्षक कर्मचाऱ्यांचा समायोजनाची समस्या भेडसावणारी आहे. त्यामुळे शिक्षकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यांनीही समायोजनाची मागणी केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)