कांदा आयात बंद करा

By Admin | Updated: August 2, 2014 00:46 IST2014-08-01T23:51:13+5:302014-08-02T00:46:58+5:30

राहुरी : कांद्याची आयात बंद करावी व इतर मागण्यांसाठी नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी येथे युवक काँगे्रसच्यावतीने रास्तारोको करण्यात आला़

Close the onion import | कांदा आयात बंद करा

कांदा आयात बंद करा

राहुरी : कांद्याची आयात बंद करावी व इतर मागण्यांसाठी नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी येथे युवक काँगे्रसच्यावतीने रास्तारोको करण्यात आला़ तसेच कांद्याचा लिलाव बंद पाडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला़ सुमारे अर्धा तासानंतर कांदा लिलाव पुर्ववत सुरु करण्यात आले़
कांद्याचे निर्यातमुल्य कमी करावे, कांदा आयातीवर बंदी आणावी व कांद्याला भाव वाढवून द्यावा या मागण्यासाठी युवक काँगे्रसने रास्तारोको केला़ स्वप्नील अर्जुनराव पानसंबळ यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्याचे निवेदन युवा नेते हेमंत आेंगले यांच्या हस्ते नायब तहसीलदार बी़ टी़तेलोरे व पोलीस उपनिरीक्षक संजय गंगावले यांना देण्यात आले़
मोर्चासमोर बोलताना हेमंत ओगले म्हणाले क ी, ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ कांद्याचे भाव घसरत असून, शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे़ केंद्र शासनाने आयातीवर बंदी घालावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ओगले यांनी दिला़ यावेळी साईनाथ कदम, भारत तारडे, अलोक पवार यांची भाषणे झाली़
रास्तारोको आंदोलनानंतर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंदोलक शिरले़ बाजार समितीत सुरु असलेला काद्याचा लिलाव आंदोलकांनी बंद पाडला़ त्यामुळे काही काळ व्यापारी निघून गेले़ लिलाव बंद झाल्याचे पाहून आंदोलक निघून गेले़ शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुन्हा अर्ध्या तासानंतर कांद्याचा लिलाव सुरु झाला़ शुक्रवारी राहुरीत कांद्याचे भाव स्थिर राहिले़ आंदोलकांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांची भेट घेऊन चर्चा केली़ कांद्याचे भाव वाढण्याची गरज आंदोलकांनी व्यक्त केली़ कांद्याची आवक अधिक असून परराज्यातील व्यापारी निघून गेल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल, त्यामुळे आंदोलकांनी योग्य निर्णय घ्यावा, असे सभापती तनपुरे यांनी सुचविले़
(तालुका प्रतिनिधी)
राहात्यात कांदा @२२००
राहाता : राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी एकूण २४,५८५ कांदा गोण्यांची आवक झाली़ एक नंबर कांद्याला २००० ते २२०० रुपये, दोन नंबर कांद्याला १२०० ते १९५० रुपये, तीन नंबर कांद्याला ६०० ते ११५० रुपये, गोल्टी कांद्याला १४०० ते १६०० रुपये, जोड कांद्याला ३०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला़

Web Title: Close the onion import

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.