कोपरगावात माझी वसुंधरा अभियानांतर्गत गोदावरी नदीची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:39+5:302021-01-08T05:04:39+5:30

कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानातील जल घटकांतर्गत शहर व परिसरातील जलस्त्रोतांची स्वच्छता अभियानांतर्गत मंगळवारी (दि.५) ...

Cleaning of Godavari river in Kopargaon under my Vasundhara Abhiyan | कोपरगावात माझी वसुंधरा अभियानांतर्गत गोदावरी नदीची स्वच्छता

कोपरगावात माझी वसुंधरा अभियानांतर्गत गोदावरी नदीची स्वच्छता

कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानातील जल घटकांतर्गत शहर व परिसरातील जलस्त्रोतांची स्वच्छता अभियानांतर्गत मंगळवारी (दि.५) गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करण्यात आले. तसेच कचेश्वर व शुक्लेश्वर घाट येथे स्वच्छता मोहीम राबवून नदीपात्रातील व परिसरातील साफसफाई करण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेत नदीपात्रातील ३ ट्रॅक्टर कचरा गोळा करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे पाठिण्यात आला. मोहीम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी यासह गोदामाई प्रतिष्ठान टीम यांच्या सक्रिय सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, नगरसेवक जनार्धन कदम, शिवाजी खांडेकर, सत्यजित मुंदडा, आदिनाथ ढाकणे यांच्यासह कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गोदामाई प्रतिष्ठानच्या टीमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Cleaning of Godavari river in Kopargaon under my Vasundhara Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.