शहराचा पाणी पुरवठा आज बंद
By Admin | Updated: August 23, 2014 00:44 IST2014-08-22T23:21:58+5:302014-08-23T00:44:07+5:30
अहमदनगर: शहर पाणी पुरवठा योजनेवरील दुरूस्तीसाठी वीज पुरवठा बंद राहणार असल्याने शनिवारी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

शहराचा पाणी पुरवठा आज बंद
अहमदनगर: शहर पाणी पुरवठा योजनेवरील दुरूस्तीसाठी वीज पुरवठा बंद राहणार असल्याने शनिवारी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. रविवारी उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
पाणी पुरवठा योजनेवरील दुरुस्तीसाठी शनिवारी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत राहणार आहे. त्यामुळे मुळानगर, विळद येथील पाणी उपसा बंद राहणार आहे. परिणामी शहरातील पाणी वितरणाच्या टाक्या भरणार नाहीत. त्यामुळे पाईपलाईन रस्ता, लक्ष्मीनगर,सूर्यनगर, निर्मलनगर तसेच स्टेशन रस्ता, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, शिवाजीनगर भागास सकाळी दहानंतर पाणी पुरवठा होणार नाही. रविवारी उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
(प्रतिनिधी)