नगरची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?, अनेक नगरसेवक शिंदेंची भेट घेण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 13:13 IST2022-07-20T13:12:33+5:302022-07-20T13:13:10+5:30
अनेक नगरसेवक आजच एकनाथ शिंदेंची भेट घेण्याच्या तयारीत आहेत.

नगरची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?, अनेक नगरसेवक शिंदेंची भेट घेण्याच्या तयारीत
अहमदनगर: महापालिकेतील २४ पैकी १० ते १५ नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. आजच सायंकाळी मुंबईत जाऊन ते नगरसेवक मुख्यमंत्री शिंदे यांना भेटणार असल्याची माहिती आहे.
माजी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, माजी नगरसेवक अनिल लोखंडे, सुभाष लोंढे आदी नगरसेवक वेगळा गट तयार करत असल्याची माहिती आहे. इतर नगरसेवकांनाही फोन करून शिंदे गटात येण्यासाठी साकडे घातले जात आहे.
परंतु आज दिल्लीच्या कोर्टामध्ये काय घडामोडी होतात? याकडे लक्ष असून त्यावरच किती नगरसेवक शिंदे गटात जाणार याचा आकडा निश्चित होईल. मंगळवारी संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या बैठकीला २४ पैकी फक्त १० नगरसेवक उपस्थित होते. सर्व नगरसेवक ठाकरेंसोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते.