डोळ्यांनी टिपा नगर शहराचा ऐतिहासिक वारसा

By Admin | Updated: August 19, 2014 23:28 IST2014-08-19T23:13:03+5:302014-08-19T23:28:14+5:30

अहमदनगर : हिरवाईने नटलेल्या या परिसराला ऐतिहासिक स्थळांनी आणि वास्तुंनी शिरपेच चढवला आहे.

The city's historic heritage of the city | डोळ्यांनी टिपा नगर शहराचा ऐतिहासिक वारसा

डोळ्यांनी टिपा नगर शहराचा ऐतिहासिक वारसा

अहमदनगर : डोंगर-कडेकपारीतल्या निसर्गसौंदर्याने नगरची भूमी समृध्द आहे. धार्मिकदृष्ट्या देशातील महत्वाचे श्रद्धास्थान असलेल्या या जिल्ह्याला शिवरायांच्या पुण्याईचा स्पर्श आहे तर हिरवाईने नटलेल्या या परिसराला ऐतिहासिक स्थळांनी आणि वास्तुंनी शिरपेच चढवला आहे. आपल्या या अहमदनगरचे अलौकिक सौंदर्य टिपण्यासाठी ‘लोकमत उमंग’ अंतर्गत व समर्थ डिजीटल लॅब यांच्या सहकार्याने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘जागतिक छायाचित्र दिनानिमित्त’ होणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निसर्गस्थळे/ पर्यटनस्थळे असा विषय आहे. निवड झालेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन नगर-पुणे रोडवरील ओम गार्डन येथे २३ व २४ आॅगस्टला होईल. जिल्ह्यातील रेहेकुरी अभयारण्य, हरिश्चंद्र गड, भंडारदरा धरण या प्रचलित स्थळांव्यतिरिक्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या पुरातन वास्तुही पर्यटकांना आकर्षित करत आहेत. अहमदनगरचे हे सौंदर्य कॅमेराबद्ध करणाऱ्या छायाचित्रकारांना व्यासपीठ देण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा हौशी व व्यावसायिक अशा दोन गटांत होणार आहे. त्यातील छायाचित्राचा आकार ८ बाय १२ इंच असावा व त्याला पांढऱ्या रंगाचे १० बाय १४ माऊंट असावेत. स्पर्धकांनी छायाचित्रास योग्य शीर्षक द्यावे व त्यामागे आपले नाव लिहावे, छायाचित्रावर कोणतेही संगणकीय काम केलेले नसावे. छायाचित्र स्पर्धेसाठी निवडण्याचा अधिकार निवड समितीचा असणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेसाठी निवडलेली छायाचित्रे या प्रदर्शनात लावली जातील. स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला रु. ३०००/- चे पारितोषिक, द्वितीय क्रमांक विजेत्यास रु. २०००/- व तृतीय विजेत्यास रु. १०००/- बक्षीस दिले जाईल. याशिवाय दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत. इच्छुकांनी आपले छायाचित्र २२ तारखेपर्यंत ‘लोकमत’ कार्यालयात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)
क्लिक करा, मदत करा
या उपक्रमाला सामाजिक कार्याची झालर देत प्रदर्शनात मांडल्या गेलेल्या छायाचित्रांच्या विक्रीतून मिळणाऱ्या निधीतील रक्कम ‘स्रेहालय’ या संस्थेला देण्यात येणार आहे. तुम्ही कॅमेराबद्ध केलेले नगरचे सौंदर्य स्रेहालयातील बालकांसाठी अर्थसहाय्य करेल.

Web Title: The city's historic heritage of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.