नगरसाठी लवकरच ऑक्सिजन, रेमडेसिविर उपलब्ध करून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:22 IST2021-04-21T04:22:10+5:302021-04-21T04:22:10+5:30

अहमदनगर : नगर शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांसाठी रेडमेसिविर व ऑक्सिजनचा लवकरच पुरवठा केला जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश ...

The city will soon be providing oxygen, remedivir | नगरसाठी लवकरच ऑक्सिजन, रेमडेसिविर उपलब्ध करून देणार

नगरसाठी लवकरच ऑक्सिजन, रेमडेसिविर उपलब्ध करून देणार

अहमदनगर : नगर शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांसाठी रेडमेसिविर व ऑक्सिजनचा लवकरच पुरवठा केला जाईल, असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रेडमेसिविर व ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी मुंबई येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी महापालिका स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान आमदार जगताप यांनी नगर शहरातील वस्तुस्थिती टोपे यांच्यासमोर मांडली. नगर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढल्याने ऑक्सिजन व रेमडेसिविरची गरज भासत आहे. खासगी रुग्णालयांना दररोज ४० ते ५० टन इतक्या ऑक्सिजनची आवश्यकता आहे; परंतु त्या तुलनेत पुरवठा होत नाही. प्रशासनाकडून मागणी नोंदविण्यात आलेली आहे; परंतु मागणीनुसार पुरवठा केला जात नाही. तसेच रेमेडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नगर शहरासाठी तातडीने आरोग्य सुविधा वाढविण्याची गरज आहे. पुढील काही दिवसांचे नियोजन करून मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी जगताप यांनी केली. वस्तुस्थितीची माहिती घेऊन टोपे यांनी नगर शहरासाठी लवकरच पुरेसा ऑक्सिजन, इंजेक्शन उपलब्ध करून दिले जातील, असे आश्वासन यावेळी टोपे यांनी दिले.

....

२०संग्राम जगताप

रेमडेसिविर, ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली.

Web Title: The city will soon be providing oxygen, remedivir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.