नगरमध्ये आता फक्त दुसराच डोस मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:20 IST2021-05-01T04:20:07+5:302021-05-01T04:20:07+5:30
अहमदनगर : लस उपलब्ध होत नसल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांनाच फक्त लस देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ...

नगरमध्ये आता फक्त दुसराच डोस मिळणार
अहमदनगर : लस उपलब्ध होत नसल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांनाच फक्त लस देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पहिला डोस दिला जाणार असल्याचे आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले.
कोरोनावरील लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु, लस उपलब्ध होत नाही. नगर शहरासाठी २ ते ३ हजार इतके डोस उपलब्ध हाेत आहेत. त्यात शासनाने १८ वर्षांपुढील सर्वांना डोस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी गर्दी होईल, या भीतीनेही केंद्रांसमोर रांगा लागल्या आहेत. परंतु, त्याप्रमाणात लस उपलब्ध होताना दिसत नाही. लस मिळत नसल्याने केंद्र बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर ओढावली आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांना लस मिळत नाही. जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत दुसरा डोस घेणाऱ्यांनाच फक्त लस देण्याच्या सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. परंतु, महापालिकेने यापूर्वीच हा निर्णय घेतला असून, दुसरा डोस घेणाऱ्यांनाच लस दिली जाणार असल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले. शासानाकडून लस उपलब्ध झाल्यानंतर लस उपलब्ध झाल्यानंतर पहिला व दुसरा, असे दोन्ही डोस घेणाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
..
लसीकरण केंद्रांबाहेर रांगा
कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत असल्याने लस घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. परंतु, लस उपलब्ध होत नाही. एका केंद्रावर दिवसभरात साधारण १०० जणांनाच डोस दिला जात आहे. त्यामुळे केंद्रांसमोर सकाळपासूनच रांगा लागलेल्या पाहायला मिळतात.