नगररचनाकार महासभेत खोटले बोलले, बैठकीत माफी मागितली; नगरसेवक संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 16:15 IST2023-09-26T16:14:21+5:302023-09-26T16:15:26+5:30
मराठा समाजाला सामाजिक उपक्रमासाठी नगर शहरातील नालेगाव येथील जागा देण्याबाबत तीन वर्षांपूर्वी मनपाच्या महासभेत ठराव संमत झाला होता.

नगररचनाकार महासभेत खोटले बोलले, बैठकीत माफी मागितली; नगरसेवक संतापले
अहमदनगर: महापालिकेत महासभेत मराठा समाजाला जागा देण्याबाबत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नावर मनपाच्या नगररचना विभागातील सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी चक्क चक्क खोटी माहिती दिल्याचे समोर आल्यानंतर चारठाणकर यांची चांगलीच गोची झाली. ‘माझी चूक झाली, मला माफ करा’, अशा शब्दांत त्यांनी मंगळवारी (दि.२६) नगरसेवकांच्या बैठकीत माफी मागितली.
मराठा समाजाला सामाजिक उपक्रमासाठी नगर शहरातील नालेगाव येथील जागा देण्याबाबत तीन वर्षांपूर्वी मनपाच्या महासभेत ठराव संमत झाला होता. मात्र, ही जागा अद्यापपर्यंत समाजाला मिळालेली नाही, यावर आपण काय कार्यवाही केली. असा प्रश्न नगरसेवक रुपाली वारे यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना चारठाणकर यांनी सदर प्रस्ताव अंतीम मान्यत्येसाठी शसनाकडे पाठविला असल्याचे सांगितले. दरम्यान या विषयावर सोमवारी महासभेत चर्चा न झाल्याने, याबाबत मंगळवारी आयुक्तांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक श्याम नळकांडे, डॉ. सागर बोरुडे, अविनाश घुले, सेनेेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह दिपक लांडगे, शिवजित डोके, डॉ. अविनाश मोरे आदी उपस्थित होते. यावेळी वारे यांनी आपण जर मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठिवलेला आहे तर त्याचा जावक क्रमांक द्या,
अन्यथा मी येथेच पेटवून घेईल. बारस्कर यांनीही शासनाकडे पाठविलेली फाईल दाखवा, अशी मागणी केली. यावेळी गोंधळून गेलेले चारठाणकर म्हटले माझी चूक झाली, अचानक प्रश्न आला त्यामुळे मी चुकीचे बोलून गेलो. याबाबत आपली माफी मागतो. यावर उपमहापौर भोसले, बारस्कर, वारे, डॉ. बोरुडे चांगलेच संतापले. जर फाईल शासनाकडे पाठविलीच नाही तर सभागृहाची दिशाभूल का केली, तुम्हाला खोटे बोलायचे आयुक्तांनी सांगितले का, असा बाज विचारात चारठाणकर यांच्यावर कारवाई कारवाईची मागणी केली. सभागृहात खोटे निवेदन करणे चुकीचे आहे. याबाबत नियमानुसार चारठाणकर यांच्यावर कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी सांगितले.