नगर बाजार समिती आठवडाभर बंद; कार्यालयीन कर्मचारी निघाला कोरोनाबाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 11:17 IST2020-07-15T11:16:19+5:302020-07-15T11:17:01+5:30
नगरमधील माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एक कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आला आहे. यामुळे बाजार समितीच्या प्रशासनाने नगरमधील मुख्य कार्यालय आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगर बाजार समिती आठवडाभर बंद; कार्यालयीन कर्मचारी निघाला कोरोनाबाधीत
केडगाव : नगरमधील माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एक कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आला आहे. यामुळे बाजार समितीच्या प्रशासनाने नगरमधील मुख्य कार्यालय आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
समितीचे इतर व्यवहार मात्र सुरळीत राहणार असले तरी इतर कर्मचाºयांनाही तपासणी करण्यास सांगण्यात आले. बाजार समितीमधील इतर व्यवहार मात्र तुर्त सुरूच राहणार आहेत.
दरम्यान, बाजार समितीचे मुख्य कार्यालय आठवडाभर बंद ठेवण्यात येणार आहे. इतर व्यवहार मात्र सुरूच राहतील, असे बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी सांगितले.