शहर बससेवेसाठी निविदा मागविल्या
By Admin | Updated: July 16, 2014 00:45 IST2014-07-15T23:30:05+5:302014-07-16T00:45:03+5:30
अहमदनगर: शहर बससेवा राबविण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. मंगळवारीच निविदा प्रसिध्द केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

शहर बससेवेसाठी निविदा मागविल्या
अहमदनगर: शहर बससेवा राबविण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. मंगळवारीच निविदा प्रसिध्द केल्याची माहिती प्रशासनाने दिली. निविदेची मुदत २१ दिवसांची असल्याने महिनाभरात नवीन अभिकर्ता संस्था नियुक्तीचा निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
प्रसन्ना पर्पल ही अभिकर्ता संस्था शहरात बससेवा चालवित होती. मात्र तोट्याचे कारण पुढे करत संस्थेने महापालिकेकडे दरमहा ७ लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली. स्थायी समितीने ती देण्यास असमर्थता व्यक्त करून संस्थेचा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे संस्थेने १८ जूनपासून बससेवा बंद केली.
महासभेतही हा विषय चर्चेला आला. प्रसन्नावर कायदेशीर कारवाई करून नवीन अभिकर्ता संस्था नियुक्तीचा निर्णय महासभेने घेतला. महासभेचा हा ठराव प्रशासनाकडे आल्यानंतर आयुक्तांच्या मंजुरीने शहर बससेवा चालविण्यासाठी अभिकर्ता नियुक्तीची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. २१ दिवस निविदा भरण्याची मुदत आहे. २२ व्या दिवशी निविदा उघडण्यात येणार आहे. महिनाभरात नवीन अभिकर्ता संस्था नियुक्तीचा निर्णय होईल अशी माहिती सूत्रांनी दिली.
(प्रतिनिधी)
शहर बससेवा चालविण्यासाठी शहरातील चार उद्योजकांनी महापौर संग्राम जगताप यांच्याशी चर्चा करताना होकार दर्शविला आहे. ना नफा ना तोटा तत्त्वावर महापालिकेच्यावतीने शहर बससेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे कोण-कोणत्या संस्था निविदा भरतात. याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
मनसेने शहरात मोफत बससेवा सुरू केली आहे. अशी सेवा कोणा राजकीय पक्षाला सुरू करता येते काय? त्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते की नाही याची खातरजमा करण्याचे काम मनपाने सुरू केले आहे. त्यानुससार महापालिका पुढचा निर्णय घेणार आहे.