नगर शहरात आज निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:56 IST2019-04-28T12:55:04+5:302019-04-28T12:56:12+5:30

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पाणी योजनेवरील विद्युत उपकेंद्रात अचानक बिघाड झाला.

In the city of city today, the dehydrated | नगर शहरात आज निर्जळी

नगर शहरात आज निर्जळी

अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पाणी योजनेवरील विद्युत उपकेंद्रात अचानक बिघाड झाला. पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे रविवारी शहराच्या अनेक भागात पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
विळद पंपिंग स्टेशनजवळील बुºहाणनगर पाणी योजना केंद्रावर महावितरण कंपनीकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम शनिवारी रात्री दहापर्यंत सुरूच होते. रात्री उशिरा दुरुस्ती झाली तरी पाणी पुरवठा नियमित होण्यास चार तास लागतात. त्यामुळे रविवारी मध्यवर्ती भागासह शहरात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही.

Web Title: In the city of city today, the dehydrated