अकोले शहरात एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:35 IST2020-06-28T12:34:45+5:302020-06-28T12:35:23+5:30

अकोले शहरालगत कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ राहणाºया एका वाहन चालकाचा कोरोना अहवाल रविवारी (२८ जून) पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. 

In the city of Akole, one person was found to be corona positive | अकोले शहरात एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला

अकोले शहरात एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला

अकोले : शहरालगत कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ राहणा-या एका वाहन चालकाचा कोरोना अहवाल रविवारी (२८ जून) पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे प्रशासन पुन्हा सतर्क झाले आहे. 

अकोले शहरातील एका खासगी दुकानदाराकडे चार चाकी वाहनाने नाशिक, उल्हासनगर आदी भागात जावून दुकानाचे सामान घेऊन येत असलेल्या गाडी चालकास त्रास जाणवू लागल्याने त्यास कोरोना चाचणीसाठी नगरला पाठविण्यात आले होते.

अकोले शहरातील एका खाजगी डॉक्टराकडे उपचार घेत असताना डॉक्टरांना शंका आली असता त्याला कोरोना तपासणी साठी अहमदनगरला नेले. दरम्यान त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या वाहन चालकाच्या संपर्कातील कुटुंबीयासह इतर व्यक्तींचा प्रशासन शोध घेत आहे.

Web Title: In the city of Akole, one person was found to be corona positive