कर्माचाऱ्याच्या उर्मटपणाला नागरिक वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:37+5:302021-06-04T04:17:37+5:30
गेल्या काही काळापासून जगावर कोविडचे संकट कोसळले आहे. मानोरी (ता.राहुरी) येथील आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन नागरिकांना ...

कर्माचाऱ्याच्या उर्मटपणाला नागरिक वैतागले
गेल्या काही काळापासून जगावर कोविडचे संकट कोसळले आहे. मानोरी (ता.राहुरी) येथील आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहेत. येथे कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी उपलब्ध असावेत, असा बंधनकारक नियम असतानादेखील येथे पूर्ण वेळ आरोग्य अधिकारी उपलब्ध नसतात. तसेच कर्मचाऱ्यांवरही त्यांचा अंकुश नसल्याने असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
...................
मी मानोरी येथील आरोग्य केंद्रात कोविड रॅपिड अँटिजेन चाचणीसाठी सकाळी १० वाजता गेलो असता तेथे कमीत कमी २० व्यक्ती एकाच वेळी आल्यावर चाचणी सुरू केली जाईल, असे येथील आरोग्य सेवक एस. ए. पौंदे यांनी सांगितले. दोन तास उलटल्यानंतर मला त्रास होऊ लागल्याने आमची चाचची करून द्या, विनंती केल्यानंतर तुम्हाला वेळ नसला तर वळणला, आरडगावला किंवा खासगीत जा असा सल्ला दिला. येथील आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीने मोठा मनस्ताप झाला. या उर्मट कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी.
-अविनाश आढाव
------------------
मानोरी आरोग्य केंद्रात महिला अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य सेवक हे आरोग्य केंद्रात कामयच गप्पा मारण्यात मग्न असतात. तेथे गेलेल्या रुग्णांकडेदेखील ते अनेक वेळा दुर्लक्ष करून गप्पातच मग्न होतात. त्यामुळे अनेकांना येथील आरोग्य व्यवस्थेचा वाईट अनुभव येत आहे त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष घालावे.
-बाळासाहेब पोटे
.............
मानोरी येथील आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना नागरिकांना सेवा देणे क्रमप्राप्त आहेत. परंतु हे अनेक वेळा वेळेवर हजर नसतात. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो, याकडे वरिष्ठांनी लक्ष घालावे.
-भाऊसाहेब आढाव