फाईव्ह जी टॉवर विरोधात नागरिकांनी उभारली तळतळाट गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:25 IST2021-09-12T04:25:14+5:302021-09-12T04:25:14+5:30
मोबाइल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे मोठ्या प्रमाणात चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर असताना चिमण्या वाचविण्यासाठी पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसदच्या वतीने ...

फाईव्ह जी टॉवर विरोधात नागरिकांनी उभारली तळतळाट गुढी
मोबाइल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे मोठ्या प्रमाणात चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर असताना चिमण्या वाचविण्यासाठी पीपल्स हेल्पलाइन, भारतीय जनसंसदच्या वतीने राष्ट्रीय बाल पक्षी चिमणी अभियानचा प्रारंभ करण्यात आला आहे. धर्माधिकारी मळा येथे झालेल्या या प्रबोधनात्मक आंदोलनात लहान मुलांनी कागदावर चिमण्यांची चित्रे रेखाटून चिमणी वाचवा मोबाइल टॉवर हटवाचा संदेश दिला. महिलांनी एकत्र येत काळी गुढी उभारली. यावेळी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, ललिता गवळी, वसुधा शिंदे, माधवी दांगट, ताराबाई तांबे, संध्या पवार, शिल्पा कुलथे, विठ्ठल सुरम आदी उपस्थित होते.
--------------
फोटो - ११काळी गुढी
फाईव्ह जी मोबाइल टॉवरमुळे नागरिक, पशु-पक्षी यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने धर्माधिकारी मळा परिसरात नागरिकांनी तळतळाट काळी गुढी उभारली.