कळसमध्ये चुरशीची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:51 IST2021-01-13T04:51:46+5:302021-01-13T04:51:46+5:30
जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे मतदारांच्या घरोघरी जात आपल्या शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांसाठी मतदान ...

कळसमध्ये चुरशीची निवडणूक
जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे मतदारांच्या घरोघरी जात आपल्या शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांसाठी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. तर महाविकास आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे सोन्याबापू वाकचौरे, सेनेचे विनायक वाकचौरे व राष्ट्रवादीचे ईश्वर वाकचौरे हे करत आहेत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत दिसत असली तरी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे व भाजप तालुका सरचिटणीस भाऊसाहेब पुंजा वाकचौरे हे भाजप प्रणित पॅनलचे नेतृत्व करत आहेत. पूर्वाश्रमीचे भाजप युवा मोर्चाचे ईश्वर वाकचौरे हे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. लहामटे यांच्या गोटात सामील झाले आहेत. गावातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.