चुग यांना उपनगराध्यक्षपदाची संधी?

By Admin | Updated: September 7, 2016 00:37 IST2016-09-07T00:30:56+5:302016-09-07T00:37:02+5:30

श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली

Chugh an opportunity to be the suburban head? | चुग यांना उपनगराध्यक्षपदाची संधी?

चुग यांना उपनगराध्यक्षपदाची संधी?



श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. चार महिन्यांसाठी नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदाची खांदेपालट केली जाणार असून रणजितसिंग प्रेमसिंग आहुजा ऊर्फ राजन चुग यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली जाण्याची शक्यता कॉँग्रेसच्या गोटातून वर्तविण्यात येत आहे.
डिसेंबरमध्ये नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपद यावेळी जनतेतून निवडले जाणार आहे. बिहाणी यांनी दोन विधानसभा व नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे व भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते यांच्या बालेकिल्यातून बिहाणी यांनी विजयश्री मिळवत कांबळे-चित्ते यांचा पराभव केला होता. उपनगराध्यक्षपदासाठी शामलिंग शिंदे, राजश्री सोनवणे, दिलीप नागरे, कैलास दुबैय्या यांची नावे चर्चेत असली तरी राजन चुग यांचे नाव त्यात आघाडीवर आहे. चुग हे ससाणे यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यामुळे चुग यांच्याच गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ टाकली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
विद्यमान नगरसेवक रवींद्र गुलाटी व राजेश अलग हे राजकीय मतभेदामुळे ससाणे यांच्यापासून दुरावले गेले आहेत. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय गणिते जुळविण्यात पटाईत असलेले नगरपालिकेचे सर्वेसर्वा जयंत ससाणे यांनी राजन चुग यांना संधी देऊन पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याचे मानले जाते. राजन चुग यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देऊन ससाणे यांनी आगामी राजकीय बुद्धीबळाच्या पटलावर विरोधकांना ‘चेकमेट’ देण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Chugh an opportunity to be the suburban head?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.