नेवासा शहरात नाताळनिमित्त चर्चमध्ये प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:16 IST2020-12-26T04:16:58+5:302020-12-26T04:16:58+5:30
गंगानगर परिसरात असलेल्या बेथेल चर्चमध्ये रेव्हरंट डेव्हिड राक्षे, पास्टर शारोन, ईम्म्यान्यूल चर्चमध्ये धर्मगुरू दत्ता अमोलिक, सेव्हनथ डे चर्चमध्ये रेव्हरंट ...

नेवासा शहरात नाताळनिमित्त चर्चमध्ये प्रार्थना
गंगानगर परिसरात असलेल्या बेथेल चर्चमध्ये रेव्हरंट डेव्हिड राक्षे, पास्टर शारोन, ईम्म्यान्यूल चर्चमध्ये धर्मगुरू दत्ता अमोलिक, सेव्हनथ डे चर्चमध्ये रेव्हरंट खाजेकर, चक्रनारायण वसाहतीतील चर्चमध्ये रेव्हरंट जगदीश चक्रनारायण यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी व कोरोनाच्या मुक्तीसाठी प्रार्थना केली.
पास्टर सुभाष चक्रनारायण, पास्टर प्रकाश चक्रनारायण व पास्टर हरीश चक्रनारायण यांनी देखील पवित्र प्रार्थनेच्या माध्यमातून भक्तिगीते गात प्रभू येशूच्या जन्माचा उत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना तर सर्वधर्मीय बांधवांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या.
मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, सतीश पिंपळे, पोपटराव जिरे, सुनील जाधव, अनिल ताके, बापूसाहेब गायके, भाऊसाहेब वाघ, पंकज जेधे, सुलेमान मणियार, वंचित आघाडीचे संजय सुखधान, भाजप तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या. नेवासा तालुक्यातील विविध चर्चवर विविध प्रकारची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा देखावाही तयार करण्यात आला होता.
--------
फोटो- २५नेवासा नाताळ
नेवासा येथील गंगानगर प्रभागात असलेल्या ज्ञानमाऊली चर्चमध्ये नाताळनिमित्त खिस्तीबांधवांनी प्रार्थना केली.