बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा बळी

By Admin | Updated: August 20, 2014 23:31 IST2014-08-20T23:20:34+5:302014-08-20T23:31:47+5:30

संगमनेर : नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका अडीच वर्षाच्या चिमुरडीचा बळी गेल्याची घटना तालुक्यातील जोर्वे येथे घडली.

Chimuradi victim in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा बळी

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा बळी

संगमनेर : नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका अडीच वर्षाच्या चिमुरडीचा बळी गेल्याची घटना तालुक्यातील जोर्वे येथे घडली. शेतमजूर अशोक महादू कातोरे व सुनंदा (रा. देवीपठार, साकूर) हे जोडपे दोन लहान मुलींसह जोर्वे गावातील शेतकरी रावसाहेब बोरकर यांची शेती वाट्याने करीत होते. त्यांचे बोरकर यांच्या शेतामध्ये छप्पर आहे. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांची अडीच वर्षाची मुलगी पूजा ही छपराबाहेर खेळत असताना वीज पुरवठा अचानक बंद झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले. दरम्यान अंधाराचा फायदा घेत शेजारील ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पूजा हिच्यावर झडप घेऊन तिला उचलून धूम ठोकली. हे कळल्यावर ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली. खबर मिळताच उपविभागीय वन अधिकारी शिवाजी फटांगरे, वनसंरक्षक पंढरीनाथ चोखंडे व बाबासाहेब काळे हे घटनास्थळी दाखल झाले. सर्वत्र शोधाशोध केला मात्र पूजा सापडू शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध सुरू असताना नजिकच्या शेतात पूजा मयत अवस्थेत आढळून आली. पूजाचा मृतदेह पाहताच कोतोरे दाम्पत्याने टाहो फोडला. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरीकांमध्ये दहशत पसरली आहे. वन विभागाने पिंजरा लावला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chimuradi victim in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.