चिमुकल्यांनी घेतला आषाढीचा ऑनलाइन आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:36+5:302021-07-21T04:15:36+5:30
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा करीत हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी उपक्रमशील शिक्षिका मनीषा जवणे- लोखंडे यांनी पुढाकार ...

चिमुकल्यांनी घेतला आषाढीचा ऑनलाइन आनंद
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा करीत हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी उपक्रमशील शिक्षिका मनीषा जवणे- लोखंडे यांनी पुढाकार घेतला. ज्ञानदा पठाडे, आराध्या पवार, नुसरत देशमुख, माधवी व्यवहारे, गौरी जाधव, सानवी काथवटे, ओवी बोरकर, अवनी लोखंडे, ईश्वरी फाजगे, गार्गी सोनवणे, आराध्या जाधव, कृष्णा गरुटे, गौरी भांड, आरोही आलवणे यांनी विठ्ठल- रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत रामदास, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषा करून संत परंपरेचे दर्शन घडविले व ऑनलाइन आषाढी एकादशीचा आनंद लुटला. मुख्याध्यापिका नंदा गवळी, वर्गशिक्षिका मनीषा जवणे-लोखंडे, राजेश्री जोशी, मालनबाई कोळपकर, विजय साळुंके, वैशाली कुलट, प्रफुल्ल भागवत, ज्योती बोरुडे यांनी मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, विस्तार अधिकारी शिवाजी कराड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.