टोपी न दिल्याने मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 04:37 IST2018-01-29T04:37:24+5:302018-01-29T04:37:56+5:30

आईने टोपी घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने शनिवारी दुपारी क्रिश रामू मगर (१२) याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

 The child's suicide attempt by not giving hat | टोपी न दिल्याने मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न  

टोपी न दिल्याने मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न  

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : आईने टोपी घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने शनिवारी दुपारी क्रिश रामू मगर (१२) याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
क्रिश याने टोपी घेण्यासाठी आईकडे पैशांची मागणी केली. तिने नकार दिल्याने रागाच्या भरात क्रिश याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचा मोठा भाऊ रोशन याने त्यास वाचविले. मगर कुटुंब मूळचे नेपाळ येथील असून, १५ वर्षांपासून ते येथे राहतात. आजीच्या दशक्रिया विधीच्या दिवशी डोक्यावरील केस काढल्यानंतर क्रिशने टोपी घेण्यासाठी पैसे मागितले होते. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे वडील वेटर, तर आई शेतमजूर आहे.

Web Title:  The child's suicide attempt by not giving hat