बालविकास प्रकल्प अधिकारी माने यांच्या जीविताला धोका
By | Updated: December 7, 2020 04:15 IST2020-12-07T04:15:01+5:302020-12-07T04:15:01+5:30
जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी रात्री हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत कारमध्ये माने होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. ...

बालविकास प्रकल्प अधिकारी माने यांच्या जीविताला धोका
जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी रात्री हत्या झाली तेव्हा त्यांच्यासोबत कारमध्ये माने होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. घटनेनंतर माने यांनीच जरे यांना रुग्णालयात पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मी रेखा जरे यांच्या खुनाच्या गुन्ह्यात साक्षीदार असल्याने माझ्या जीवितास यातील आरोपींपासून धोका होण्याची शक्यता आहे. मी सरकारी साक्षीदार असल्याने मला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी माने यांनी तपासी अधिकाऱ्यांकडे केली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील रविवारी सुटीवर असल्याने पोलीस संरक्षण मागणीचा अर्ज सोमवारी त्यांना देणार असल्याचे माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. हत्याकांडानंतर माने या पोलिसांच्या संपर्कात नसल्याची चर्चा होती. या घटनेनंतर मात्र अनेकांनी फोन करून विचारपूस केली. ‘या सर्व घटनेचा मानसिक त्रास झाला, त्यामुळे दोन दिवस मी माेबाईल बंद ठेवला होता, तसेच माझ्या आईला गावाकडे पाेहोच करायचे होते, त्यामुळे मी गावी गेले होते,’ असे माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलिसांनी माने यांना सोमवारीही जबाबासाठी बोलाविले आहे.
--------------------------------------------
रेखा जरे यांची हत्या मी प्रत्यक्ष पाहिली. या घटनेनंतर माझा रक्तदाब वाढला होता. माझी आईही घाबरून गेली होती. कामानिमित्त मी दोन दिवस गावी गेले होते. मात्र, मी पोलिसांच्या संपर्कात होते. मी फरार झाल्याची चर्चा चुकीची आहे. रविवारी तपासी अधिकाऱ्यांकडे जबाब नोंदविला आहे. सोमवारी पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून पोलीस संरक्षणाची मागणी करणार आहे.
- विजयामाला माने, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी.