मुख्यमंत्र्यांनी रावणासारखा गर्व करू नये - नाना पटोले यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 16:39 IST2018-01-27T16:38:45+5:302018-01-27T16:39:18+5:30

मुख्यमंत्र्यांचा थेट नामोउल्लेख टाळत पटोले यांनी रावणाचे उदाहरण देवून त्यांच्यासारखा कुणीही गर्व करून नये, असा सल्ला दिला.

 Chief Minister should not be proud of Ravana - Advice from Nana Patole | मुख्यमंत्र्यांनी रावणासारखा गर्व करू नये - नाना पटोले यांचा सल्ला

मुख्यमंत्र्यांनी रावणासारखा गर्व करू नये - नाना पटोले यांचा सल्ला

शिर्डी : भाजपचा आवाज कोणही दाबू शकत नाही, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा माजी खासदार नाना पटोले यांनी आज शेलक्या शब्दात समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांचा थेट नामोउल्लेख टाळत पटोले यांनी रावणाचे उदाहरण देवून त्यांच्यासारखा कुणीही गर्व करून नये, असा सल्ला दिला.
खडसे, राणे या बहुजन समाजातील नेत्यांना संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. छगन भुजबळ केवळ बहुजन समाजातील नेते आहेत, म्हणून आत आहेत. डाकु लोकांचे काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थीत केला. राष्ट्रीय ओबीसी जनगणना परिषदेसाठी आलेल्या पटोले यांनी पत्रकारांशी बोलतांना राज्य व केंद्र सरकारवर सडकुन टीका केली. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळली नसून शेतक-यांचा विश्वासघात केला आहे. यामुळेच शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. लोकशाही संविधानावर चालली पाहिजे. सध्या मात्र एका विचाराचा अजेंडा राबवला जात आहे. पाच-दहा टक्के नागरिक समाधानी असतील पण नव्वद टक्के जनता नाराज आहे. बहुजनांची थिंक टँक निर्माण होण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

Web Title:  Chief Minister should not be proud of Ravana - Advice from Nana Patole