‘त्या’ पत्राच्या सत्यतेबाबत मुख्यमंत्र्यांना शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST2021-03-22T04:18:35+5:302021-03-22T04:18:35+5:30

संगमनेर : परमबीर सिंग यांनी जे पत्र दिले, ते त्यांची बदली झाल्यानंतर दिले आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ...

The Chief Minister has doubts about the veracity of that letter | ‘त्या’ पत्राच्या सत्यतेबाबत मुख्यमंत्र्यांना शंका

‘त्या’ पत्राच्या सत्यतेबाबत मुख्यमंत्र्यांना शंका

संगमनेर : परमबीर सिंग यांनी जे पत्र दिले, ते त्यांची बदली झाल्यानंतर दिले आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या सर्व विषयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यक्तीशः लक्ष घालत आहेत. या पत्राच्या सत्यतेबाबत मुख्यमंत्र्यांना शंका वाटत आहे. त्यामुळे यावर आम्ही काही वेगळे बोलणे आवश्यक वाटत नाही, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर रविवारी ( दि. २१) महसूलमंत्री थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. या पत्राच्या सत्यतेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: लक्ष घालून त्याची पडताळणी करत आहेत, असेही थोरात म्हणाले.

Web Title: The Chief Minister has doubts about the veracity of that letter