कुकडीचे आवर्तन दोन दिवस वाढविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:47+5:302021-03-10T04:21:47+5:30
श्रीगोंदा : रब्बी पिकासाठी जीवदान ठरणारे कुकडीचे उन्हाळी आवर्तन आणखी दोन दिवस वाढविण्यात आले आहे. यामुळे शेतक-यांना दिलासा मिळणार ...

कुकडीचे आवर्तन दोन दिवस वाढविले
श्रीगोंदा : रब्बी पिकासाठी जीवदान ठरणारे कुकडीचे उन्हाळी आवर्तन आणखी दोन दिवस वाढविण्यात आले आहे. यामुळे शेतक-यांना दिलासा मिळणार आहे.
२८ फेब्रुवारी रोजी पंचायत समितीचे माजी उपसभापती पुरुषोत्तम लगड, शहाजी हिरवे, राजेश डांगे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांची भेट घेऊन आवर्तन वाढविण्याची मागणी केली होती.
शेतकऱ्यांच्या मागणीचा गंभीर्याने विचार करून डॉ. सुजय विखे पाटील यांनी तत्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत माहिती घेतली. त्यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यानंतर येडगाव डावामधून कालव्यातून श्रीगोंद्यासाठी आणखी दोन दिवस आवर्तन वाढविले आहे. या निर्णयामुळे तालुक्याला अतिरिक्त १३० एमसीएफएसटी पाणी मिळणार आहे, असे विखे यांनी सांगितले.