आव्हान देणाऱ्यांनी स्वत:ची कुवत पहावी : गर्जे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:31+5:302021-09-25T04:21:31+5:30
मिरी : देशच नव्हे तर आशिया खंडात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला आव्हान देणाऱ्यांनी स्वतःची कुवत तपासावी, असे प्रत्युत्तर ...

आव्हान देणाऱ्यांनी स्वत:ची कुवत पहावी : गर्जे
मिरी : देशच नव्हे तर आशिया खंडात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला आव्हान देणाऱ्यांनी स्वतःची कुवत तपासावी, असे प्रत्युत्तर भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. गर्जे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ आजारी होते तर त्यांनी कमीत कमी पाथर्डी-शेवगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स घ्यायला हवी होती. तशी साधी तसदीही त्यांनी घेतली नाही. यावरूनच त्यांची असंवेदनशीलता दिसून येते. अतिवृष्टीने दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पालकमंत्री मुश्रीफ यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी काय प्रयत्न केले याचे स्पष्टीकरणही द्यावे, अशी मागणी गर्जे यांनी केली. ज्यांना ग्रामपंचायतीमध्ये झेंडा फडकविता आला नाही, अशा लोकांनी आम्हाला रोखण्याची भाषा करू नये. नाहीतर युवा मोर्चा आपली ताकद दाखवून देईल, असा सूचक इशारा युवा मोर्चा जिल्हा सचिव शुभम मोटे यांनी दिला.