सभापतीपदाची लॉटरी सोमवारी
By Admin | Updated: July 22, 2014 00:09 IST2014-07-21T23:23:30+5:302014-07-22T00:09:35+5:30
अहमदनगर: जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विद्यमान सभापतींची मुदत पुढील महिन्यांत संपुष्टात येत असून, येत्या २८ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभापतींच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे़

सभापतीपदाची लॉटरी सोमवारी
अहमदनगर: जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विद्यमान सभापतींची मुदत पुढील महिन्यांत संपुष्टात येत असून, येत्या २८ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभापतींच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे़ त्यामुळे अरक्षित पंचायत समितींचे सभापतीपद यावेळी खुले होणार आहे़
विधानसभा निवडणूक तोंडावर आहे़ निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे़ सर्वच तालुक्यांतील राजकीय वातावरण तापू लागले असतानाच जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती बदलाच्या हलचाली सुरू झाल्या आहेत़ जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापतींची मुदत येत्या १२ आॅगस्ट रोजी संपत आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासानाकडून नवीन सभापती निवडीसाठीची तयारी सुरू केली असून, आरक्षण निश्चित करण्यासाठी २८ जुलैला बैठक घेण्यात येणार आहे़ जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या सभापतींसाठी अरक्षण सोडत पध्दतीने आरक्षण जाहीर केले जाणार आहे़
पंचायत समिती सभापतींची मुदत संपुष्टात आली आहे़ नवीन सभापती निवडीसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे़ आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सभापती निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे़
सध्याचे आरक्षण
अकोले- अनुसूचित जाती, संगमनेर-सर्वसाधारण महिला,कोपरगाव-ना़मा़प्र व्यक्ती, राहाता- अनुसूचित जाती व्यक्ती, श्रीरामपूर-सर्वसाधारण महिला, नेवासा-सर्वसाधारण महिला,पाथर्डी- ना़मा़प्र महिला,नगर-अनुसूचित जाती महिला,राहुरी-सर्वसाधारण व्यक्ती, श्रीगोंदा-ना़ मा़ प्रव्यक्ती, कर्जत-सर्वसाधारण महिला,जामखेड-सर्वसाधाण व्यक्ती, शेवगाव- ना़ मा़ प्र. महिला