स्वच्छ भारत अभियानाचे केंद्रीय पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:33+5:302021-03-24T04:19:33+5:30
अहमदनगर : महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक मंगळवारी नगर शहरात दाखल झाले ...

स्वच्छ भारत अभियानाचे केंद्रीय पथक दाखल
अहमदनगर : महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक मंगळवारी नगर शहरात दाखल झाले असून या पथकाकडून प्रत्येक प्रभागाची पाहणी करण्यात येत आहे.
महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेत फाईव्ह स्टार मानांकनासाठी नोंदणी केली. हे मानांकन मिळावे, यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केलेल्या आहेत. त्याची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक नगर शहरात मंगळवारी सकाळी दाखल झाले. हे पथक शहरातील प्रत्येक प्रभागाची पाहणी करणार आहे. प्रत्येक प्रभाग कचरामुक्त करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात आला आहे. महापालिकेचे शहरातील उद्याने, रेल्वेस्टेशन, बसस्थानके, सार्वजिनक ठिकाणांची पथकाकडून पाहणी केली जाणार असून, या ठिकाणी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्यानुसार गुण दिले जाणार आहेत. मागीलवर्षी नगर शहराचा देशात ४० वा क्रमांक आला होता. शहरातील घर ते घरकचरा संकलन करण्यात येते. संकलन झालेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत असून, त्यासाठी बुरुडगाव येथे कचरा डेपो उभारण्यात आलेला आहे. तसेच इतरही काही प्रकल्प सुरू करण्यात आले असून, या प्रकल्पांचीही पाहणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
...
रांगोळीव्दारे स्वच्छतेबाबत जनजागृती
शहर व परिसरात भिंती रंगविण्यात आल्या असून, रांगोळीव्दारे सवच्छतेची जनजागृती करण्यात येत आहे. केंद्रीय पथक स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी नगर शहरात दाखल झाले असून, या पथकाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे...
...
सूचना फोटो मेलवर पाठविला आहे.