केंद्र सरकारने साकळाई जलसिंचन योजना पूर्ण करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST2021-03-21T04:20:05+5:302021-03-21T04:20:05+5:30

विखे म्हणाले, ‘नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांसाठी साकळाई जलसिंचन उपसा योजना महत्त्वपूर्ण आहे. तरीही योजना अद्यापही कार्यान्वित होऊ ...

The Central Government should complete the Saklai Irrigation Scheme | केंद्र सरकारने साकळाई जलसिंचन योजना पूर्ण करावी

केंद्र सरकारने साकळाई जलसिंचन योजना पूर्ण करावी

विखे म्हणाले, ‘नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांसाठी साकळाई जलसिंचन उपसा योजना महत्त्वपूर्ण आहे. तरीही योजना अद्यापही कार्यान्वित होऊ शकली नाही. गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून शेतकरी योजनेसाठी संघर्ष करीत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूददेखील केली होती.

त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले. या योजनेकडे आघाडी सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही.

लोकहितासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेली ही योजना निधीअभावी व राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे अडकू नये, त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे यांनी यापूर्वी नाबार्डच्या अर्थसहाय्यातून वांबोरी चारी उभी केली होती. त्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असूनदेखील पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची सोय झाली आहे. याच योजनेच्या धर्तीवर साकळाई जलसिंचन उपसा योजनेला केंद्र सरकारच्या मार्फत नाबाड अंतर्गत जर अर्थसाहाय्य मिळाले तर ३२ गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल.

Web Title: The Central Government should complete the Saklai Irrigation Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.