नियम करून उत्सव साजरे करू दिले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:22 IST2021-09-11T04:22:01+5:302021-09-11T04:22:01+5:30

प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाची स्थापना आमदार राधाकृष्ण विखे आणि शालिनी विखे यांच्या हस्ते पद्मश्री विखे कारखान्याच्या कार्यस्थळावर करण्यात ...

Celebrations should be allowed by rules | नियम करून उत्सव साजरे करू दिले पाहिजे

नियम करून उत्सव साजरे करू दिले पाहिजे

प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाची स्थापना आमदार राधाकृष्ण विखे आणि शालिनी विखे यांच्या हस्ते पद्मश्री विखे कारखान्याच्या कार्यस्थळावर करण्यात आली. याप्रसंगी प्रवरा उद्योग समूहातील विविध संस्थांचे संचालक अधिकारी आणि कामगार उपस्थित होते. कोविड संकटामुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय उत्सव समितीने घेतला आहे. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विखे म्हणाले, कोरोनाचे संकट कायमस्वरूपी जावे. सर्वांच्या जीवनात पुन्हा स्थिरता येऊ दे. कोणत्याही धर्माचे उत्सव नियम करून साजरे करू द्यायला पाहिजे. परंतु महाविकास आघाडी सरकार जाणीवपूर्वक तसे निर्णय करीत नाही. मंदिरे तातडीने सुरू करावीत ही आपली मागणी कायम आहे.

100921\img-20210910-wa0135.jpg

प्रवरानगर येथे प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाची स्थापना करताना आ.राधाकृष्ण विखे पाटील आणि शालिनी विखे

Web Title: Celebrations should be allowed by rules