विश्वस्तांच्या उपस्थितीत महावीर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:21 IST2021-04-27T04:21:02+5:302021-04-27T04:21:02+5:30

पंडित पवन जोगी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. अध्यक्ष संजय कासलीवाल, माजी अध्यक्ष अनिल पांडे, उपाध्यक्ष सुहास चुडीवाल, सचिव ...

Celebration of Mahavir Jayanti in the presence of the trustees | विश्वस्तांच्या उपस्थितीत महावीर जयंती साजरी

विश्वस्तांच्या उपस्थितीत महावीर जयंती साजरी

पंडित पवन जोगी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. अध्यक्ष संजय कासलीवाल, माजी अध्यक्ष अनिल पांडे, उपाध्यक्ष सुहास चुडीवाल, सचिव जितेंद्र कासलीवाल, विश्वस्त गुलाब झांजरी, अमित गोधा यांनी सर्व विधी पार पाडले.

पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, राज मेहेर यांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेला हार घालून पाळणा हलविला. धार्मिक कार्यक्रमांचे सोशल मीडियावर ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले.

मुख्य रस्त्यावरील मूर्ती पूजन मंदिरात विश्वस्त शैलेश बाबरीय यांनी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले. शिवाजी रस्त्यावरील जैन स्थानकात कुठलाही कार्यक्रम घेण्यात आला नाही, असे अध्यक्ष रमेश लोढा यांनी सांगितले.

प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे जयंती साजरी केली गेली.

---------

फोटो ओळी : २६०४ २०२१ महावीर जयंती

येथील दिगंबर जैन मंदिरामध्ये महावीर जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना पोलीस निरीक्षक संजय सानप, अध्यक्ष संजय कासलीवाल, अनिल पांडे, सुहास चुडीवाल, जितेंद्र कासलीवाल आदी.

------

Web Title: Celebration of Mahavir Jayanti in the presence of the trustees