‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’ कार्यक्रम उत्साहात साजरा
By Admin | Updated: September 14, 2016 23:24 IST2016-09-14T23:20:39+5:302016-09-14T23:24:58+5:30
अहमदनगर : लोकमत सखी मंच व कलर्स प्रस्तुत ‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’ कार्यक्रम १३ सप्टेंबर रोजी कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडला.

‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’ कार्यक्रम उत्साहात साजरा
अहमदनगर : लोकमत सखी मंच व कलर्स प्रस्तुत ‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’ कार्यक्रम १३ सप्टेंबर रोजी कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी व्यासपीठावर विद्या कचरे, रत्नापूरकर ज्वेलर्सच्या निलीमा रत्नापूरकर, दीपाली देऊतकर, दीपा चंदे, रत्ना बंग, अनिता मंत्री, दीपाली बिहाणी, हर्षद डोळसे, डॉ.पद्मकांती कुलकर्णी, सारिका उपाध्याय आदी उपस्थित होत्या.
दीपाली नवले हिने नृत्याविष्कार सादर करून सखींची वाहवा मिळविली. यानंतर गणेश रेखाटन, मोदक व पुष्पहार स्पर्धा घेण्यात आली.
कलर्स चॅनेल म्हणजे भारतातील सर्वश्रेष्ठ लोकप्रिय प्रिमियम हिंदी जनरल एंटरटेनमेंट चॅनल आहे.
भारतीय इतिहासात पहिल्यांदा असे कार्यक्रम कलर्सने आणले आहे. जे वेगळे आहेत आणि मनाला भावणारे आहेत. प्रत्येक मालिकांचे कथानक असे होते ज्यांच्यामध्ये ताकत होती, जुन्या बुरसटलेल्या रूढी परंपरेविरुद्ध जाब विचारण्याची, फिक्शन शो पासून तर फॉरमॅट शो, रिअॅलिटी शोपासून तर ब्लॉक बास्टर चित्रपट - सदैव विविध शो आणि कार्यक्रमांनी भरलेला भरगच्च नजराणा प्रेक्षकांसाठी कायम हजर. कलर्सचे नागिन २ शनी, दिव्यांशी, आणि बिग बॉस हे आगामी आकर्षण आहे.
बक्षीस विजेत्या
मोदक : प्रथम- स्मिता भंडारी, द्वितीय- भारती पवार, तृतीय- प्रतिमा चंगेडिया.
४गणेश रेखाटन : प्रथम- किर्ती देहरेकर, द्वितीय- श्वेतल गुंड, तृतीय- भारती शिंदे.
४पुष्पहार : प्रथम- प्रमिला बोरूडे, द्वितीय- भाग्यश्री कलंत्री, तृतीय- कल्पना शिंदे.
वन मि. गेम
पैठणी विजेत्या : मंगल काळे, कविता जगताप, दीपमाला बारवकर, सविता सावंत, अलका टिपरे.
कलर्स : विजेते
कलर्सच्या मालिकांवर काही प्रश्न सखींना विचारण्यात आले. त्यामध्ये त्यांना बक्षिसे देण्यात आली.
४रिना अंधारे, रूपाली गायकवाड, लक्ष्मी काळे, शुभदा उपासणी, दर्शना धोंडे, गायत्री जोशी, मनिषा कडूस, प्रतिमा गावडे, इंदिरा तिवारी, भारती शिंदे.