नेवासा येथे पत्रकार दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:16 IST2021-01-09T04:16:52+5:302021-01-09T04:16:52+5:30

नेवासा : नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. नेवासा फाटा येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी पंचायत ...

Celebrate Press Day in Nevasa | नेवासा येथे पत्रकार दिन साजरा

नेवासा येथे पत्रकार दिन साजरा

नेवासा : नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. नेवासा फाटा येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता गडाख, सभापती रावसाहेब कांगुणे, श्रीरामपूर विभागाचे आरटीओ खान, नेवासा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश काळे, वात्रटीकाकार नवनाथ कुताळ, तालुका पत्रकार एकता संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर उपस्थित होते.

पत्रकार चंद्रकांत दरंदले व पत्रकार गणेश जोशी यांनी एकता संघाच्या सर्व सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी छत्रपती शिवाजीराजे जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे अध्यक्ष सुदामराव बनसोडे यांनी शुभेच्छा दिल्या व कै. आसाराम बनसोडे प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील सर्व पत्रकारांचा अपघात विमा उतरवणार असल्याची घोषणा केली. सूत्रसंचालन सुखदेव फुलारी यांनी केले. तर विनायक दरंदले यांनी आभार मानले.

Web Title: Celebrate Press Day in Nevasa