बेलापुरातील सीसीटीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:19 IST2021-03-18T04:19:31+5:302021-03-18T04:19:31+5:30

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे मारेकरी पकडण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेतला. त्यामुळे तपासास मदत झाली. गावातील ...

CCTV in Belapur | बेलापुरातील सीसीटीव्ही

बेलापुरातील सीसीटीव्ही

श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांचे मारेकरी पकडण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेतला. त्यामुळे तपासास मदत झाली. गावातील जे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, ते तातडीने दुरुस्त करण्यात येतील, अशी माहिती उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी दिली.

ग्रामस्थांच्या वतीने हिरण यांच्या अपहरण व खुनाच्या गुन्ह्यात आरोपींचा शोध घेणाऱ्या पोलिसांचा बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खंडागळे बोलत होते. यावेळी देविदास देसाई, रफीक शेख, ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक, मुश्ताक शेख, शिवाजी वायदंडे, मोहसीन सय्यद, लहानू नागले, महेश कुऱ्हे, सुहास शेलार उपस्थित होते. बेलापूर दूरक्षेत्रचे हवालदार अतुल लोटके, पोलीस नाईक गणेश भिंगारदे, रामेश्वर ढोकणे, निखिल तमनर, हरीश पानसंबळ, पोपट भोईटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळ किशोर कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कुऱ्हे, सागर साळवे व उपस्थित होते.

----------

Web Title: CCTV in Belapur