अवैध वाळूचा उपसा करणारा ट्रॅक्टर पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:14+5:302021-07-02T04:15:14+5:30

अकलापूर गावचे तलाठी बाबासाहेब नरवडे यांना शेळकेवाडी गावच्या शिवारात कच नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती ...

Caught a tractor pulling illegal sand | अवैध वाळूचा उपसा करणारा ट्रॅक्टर पकडला

अवैध वाळूचा उपसा करणारा ट्रॅक्टर पकडला

अकलापूर गावचे तलाठी बाबासाहेब नरवडे यांना शेळकेवाडी गावच्या शिवारात कच नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाल प्रशांत आभाळे यांच्यासह तलाठी नरवडे यांनी दुचाकीवर जाऊन छापा टाकला. आयाज पठाण (रा.कुरकुंडी) व श्रीकांत पोपट भोईरकर हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू उपसा करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ट्रॅक्टर ताब्यात घेऊन चौकशीअंती कोणत्याही प्रकारचा वाळूचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत ट्रॅक्टरसह (एम. एच. १४ बी.एम.२६१४) एक ब्रास वाळू, फावडे, टोकऱ्या, चाळणी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ट्रॅक्टर घारगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला होता. गुरुवारी १ लाख ४२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला असल्याचे नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी सांगितले.

Web Title: Caught a tractor pulling illegal sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.