शेवगावात तरुणाकडून गावठी कट्टा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:02 IST2017-10-03T16:02:30+5:302017-10-03T16:02:56+5:30
गावठी कट्ट्याचे लोन आता श्रीरामपूर मार्गे थेट शेवगावपर्यंत पोहोचले आहे. पोलीस पथकाने एका तरुणाकडून गावठी कट्टा जप्त करुन त्यास अटक केली आहे. सोमवारी शेवगाव येथे ही कारवाई करण्यात आली.

शेवगावात तरुणाकडून गावठी कट्टा जप्त
शेवगाव : गावठी कट्ट्याचे लोन आता श्रीरामपूर मार्गे थेट शेवगावपर्यंत पोहोचले आहे. पोलीस पथकाने एका तरुणाकडून गावठी कट्टा जप्त करुन त्यास अटक केली आहे. सोमवारी शेवगाव येथे ही कारवाई करण्यात आली.
हेमंत उर्फ दत्तू किशोर शेळके (वय २९) हे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो श्रीरामपूर येथील मूळ रहिवासी आहे. हा कट्टा श्रीरामपूर येथून आणला असून पाथर्डी येथे एका तरुणाच्या मदतीने कट्टा विकणार असल्याची कबुली त्याने दिली. या व्यवहारात सहभागी लोकांची नावे त्याने दिली. या लोकांच्या शोधात पोलीस पथके रवाना झाली आहेत, असे शेवगावचे पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी सांगितले.
शेवगावमधील आणखी काहीजण या बेकायदा व्यवहारात सहभागी असण्याची शक्यता आहे. शेवगावचे पोलीस उप अधीक्षक अभिजित शिवथरे, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी शेवगाव तहसील कार्यालया समोरून पोलीस पथकाच्या मदतीने आरोपीस अटक करण्यात आली. आरोपी शेळके २० मे २०१६ पासून दोन वर्षांसाठी हद्दपार आहे.