गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल; ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By रोहित टेके | Updated: May 8, 2023 09:44 IST2023-05-08T09:44:07+5:302023-05-08T09:44:21+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई: कोपरगाव तालुक्यातील सुरेगावातील घटना

Case registered against illegal transport of Gutkha; 6 Lakhs seized | गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल; ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल; ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोपरगाव (जि. अहमदनगर ): तालुक्यातील सुरेगाव येथील पोलट्री फार्म जवळ एका छोट्या टेम्पोतून गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एकावर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. ७)रात्री कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी एका छोट्या टेम्पोसह (क्र.एम.एच १५ एच.एच ४००१),  विविध प्रकारचा गुटखा असा एकूण ६ लाख ११ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे यांनी रितेश सुभाष गादीया ( रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव जि.अहमदनगर ) याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी फरार झाला असून या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक कूसारे करीत आहेत.

Web Title: Case registered against illegal transport of Gutkha; 6 Lakhs seized