नगर-पुणे हायवेच्या दुभाजकावर कार झाली आडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 16:51 IST2018-04-27T16:51:20+5:302018-04-27T16:51:28+5:30
चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती दुभाजकाला आदळून रस्त्यावर आडवी झाली. यामुळे कारसह तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने त्यांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. नगर-पुणे मार्गावरील केडगाव येथे हा विचित्र अपघात झाला.

नगर-पुणे हायवेच्या दुभाजकावर कार झाली आडवी
केडगाव : चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती दुभाजकाला आदळून रस्त्यावर आडवी झाली. यामुळे कारसह तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने त्यांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. नगर-पुणे मार्गावरील केडगाव येथे हा विचित्र अपघात झाला.
कार (क्रमांक एम. एच. १६ बी वाय ६७७५) नगरहून केडगावच्या दिशेने येत होती. हॉटेल निशा पॅलेससमोर या कारचा ताबा सुटून ती दुभाजकावर जाऊन रस्त्यावरच आडवी झाली. त्यामुळे कार मागे असणारा ट्रक कारवर तर ट्रक मागे असणारी एस. टी. बस ट्रकवर आदळली. यात कार व ट्रकसह बसचे नुकसान झाले. बसच्या काचा फुटून दर्शनी भागाचे नुकसान झाले. अपघात होताच बसमधील प्रवासी भयभीत होऊन खाली उतरले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातामुळे अहमदनगर-पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.