ऊसतोडणी मजूर दोन दिवसानंतरही सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:16 IST2020-12-26T04:16:40+5:302020-12-26T04:16:40+5:30
मुकादम मुलानी याने वसंत जाधव यांच्याकडे ऊस तोडणीसाठी काही मजुरांची मागणी केली होती. त्यानुसार जाधव यांनी खिर्डी (ता. श्रीरामपूर) ...

ऊसतोडणी मजूर दोन दिवसानंतरही सापडेना
मुकादम मुलानी याने वसंत जाधव यांच्याकडे ऊस तोडणीसाठी काही मजुरांची मागणी केली होती. त्यानुसार जाधव यांनी खिर्डी (ता. श्रीरामपूर) येथील काही ऊसतोडणी मजुरांशी मुलानी याची भेट घालून दिली. मुलानी याने मजुरांना १२ हजार रुपयांची उचल दिली. मात्र, ते कामावर गेले नाहीत. त्यानंतर मुलानी याने २० डिसेंबर रोजी वसंत जाधव यांना घरी येऊन मारहाण करत बळजबरीने कारमध्ये बसवून नेले. जीवे मारण्याची धमकी दिली. जाधव यांच्या मुलाला फोन करून त्यांच्या सोडवणुकीसाठी चार लाख रुपयांची मागणी केली. लोणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक सोलापूर येथे पोहोचले असल्याचे सांगितले. मात्र, त्याचा संपर्क होत नसल्याने अद्यापही जाधव यांची सोडवणूक झालेली नाही, अशी माहिती दिली. श्रीरामपूर येथील जिल्हा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस बाळासाहेब सुरुडे व कृष्णा बडाख हे याप्रकरणी यांनी याप्रकरणी पीडित परिवाराला मदत केली.
......