लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात करिअर गायडन्स सेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:20 IST2021-02-12T04:20:52+5:302021-02-12T04:20:52+5:30
पिंपळगाव माळवी : अहमदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये करिअर ...

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात करिअर गायडन्स सेल
पिंपळगाव माळवी : अहमदनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये करिअर गायडन्स सेलची स्थापना केली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना भावी जीवनात करिअरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शालेय जीवनातच विविध करिअरच्या संधीची माहिती देण्यासाठी विविध मान्यवरांची व्याख्याने व कृती सत्रांचे मासिक आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष खासेराव साबळे यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकास व दहावीनंतर करिअरच्या वाटा याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एल. ठुबे होते. यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक लंके व सामाजिक कार्यकर्ते कचरू सोनार, विद्यालयाचे शिक्षक प्रशांत खंडागळे उपस्थित होते. सूत्रसंचालन महादेव भद्रे यांनी केले.