कोल्हार घोटी रस्त्यावर ओढ्यात कार वाहून गेली, दोन जणांचे मृतदेह आढळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 00:01 IST2022-07-15T23:58:39+5:302022-07-16T00:01:10+5:30
ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान घडली.

कोल्हार घोटी रस्त्यावर ओढ्यात कार वाहून गेली, दोन जणांचे मृतदेह आढळले
राजुर ( जि.अहमदनगर): अकोले तालुक्यातील कोल्हार- घोटी रस्त्यावर वारुघुशी फाट्याजवळील ओढ्यात कार वाहून गेली. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान घडली. यात दोन मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत. तिसरी व्यक्ती वाहून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वाहनातील एकजण काच फोडून बाहेर आल्याने तो वाचला. मात्र तो घाबरलेला असल्याने त्याला बोलता येईना. त्यामुळे मृतांची नावे कळू शकली नाहीत. मृत दोघे हे औरंगाबाद येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुर्घटना दुर्गम भागात घडल्याने व रात्रीची वेळ असल्याने या घटनेची माहिती देण्यास स्थानिकांही अडचणी आल्या. माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारमधील दोन मृतदेह बाहेर काढून राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात येत आहेत,असे पोलिसांनी सांगितले.