आंबीखालसातून कारची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 15:59 IST2019-06-22T15:58:58+5:302019-06-22T15:59:16+5:30
नाशिक पुणे महामार्गालगत आंबी खालसाच्या (ता.संगमनेर) प्रभाकरनगर परिसरात घरासमोर पार्क केलेली बोलेरो कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

आंबीखालसातून कारची चोरी
घारगाव : नाशिक पुणे महामार्गालगत आंबी खालसाच्या (ता.संगमनेर) प्रभाकरनगर परिसरात घरासमोर पार्क केलेली बोलेरो कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार शनिवारी (ता. २२) सकाळी उघडकीस आला. दिनकर रामभाऊ गाडेकर (वय ४६, रा.प्रभाकरनगर आंबी खालसा ता.संगमनेर) यांनी याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दुचाकी चोरीच्या घटना सुरू असताना आता मोठ्या वाहनांचीही चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये वाहन चोरट्यांची धास्ती निर्माण झाली आहे.
नाशिक-पुणे महामार्गालगत आंबी खालसा येथे शुक्रवारी रात्री दिनकर गाडेकर यांच्या घरासमोर त्यांच्या मालकीची बोलेरो कार (क्रमांक एम. एच. १२ जी. व्ही. ६७२३) चोरट्याने बनावट किल्लीच्या मदतीने लांबवली. शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान हा प्रकार घडला. पार्क केलेल्या ठिकाणी वाहन आढळले नाही, त्यामुळे गाडेकर यांनी आसपास शोध घेतला. वाहन चोरी झाल्याचे स्पष्ट होताच, त्यांनी घारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल एस.एम.विखे करत आहे.