नगर-पुणे रोडवर दुचाकीच्या अपघातात तीन तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 14:56 IST2020-05-27T14:16:31+5:302020-05-27T14:56:39+5:30
भरधाव वेगात जाणारी दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह तीन तरुणांचा मृत्यू झाला. नगर-पुणे रोडवरील सुपा टोलनाका चौकात मंगळवारी (२६ मे) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

नगर-पुणे रोडवर दुचाकीच्या अपघातात तीन तरुण ठार
सुपा : भरधाव वेगात जाणारी दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह तीन तरुणांचा मृत्यू झाला. नगर-पुणे रोडवरील सुपा टोलनाका चौकात मंगळवारी (२६ मे) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
वशीम सफीकउद्दीन मन्यार (खान) (वय २५, रा.पुणे, मूळ रा.उत्तरप्रदेश), अक्षय सुनील मकासरे (वय २५, रा.औंध, कस्तुरबावस्ती पुणे), अमीत मोनीराम चव्हाण (वय-२५, रा.पिंप्री गुरव, पुणे) अशी या अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. अॅक्टीवा विना नंबरची दुचाकी वशीम सफीकउद्दीन मन्यार (खान) हा भरधाव वेगाने घेऊन चालला होता. यावेळी सुपा टोलनाका चौकात ही दुचाकी एका दुभाजकावर आदळली. दुचाकी दुभाजकावर इतक्या जोरात आदळली की पलिकडच्या रस्त्यावरुन जाणा-या ट्रकवर जाऊन आदळली. यामुळे दुचाकीवरील तिघे तरुण ठार झाले. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी सुपा पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.