कारने पादचाऱ्याला उडविले; एक ठार, महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 11:41 IST2021-11-21T11:40:50+5:302021-11-21T11:41:06+5:30
गोविंद लूमा मधे (वय ६५, रा.खळमाळ,बोटा) हे बोटा येथील गावंदरा ओढ्याकडे अंघोळीसाठी जात होते.

कारने पादचाऱ्याला उडविले; एक ठार, महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच
अहमदनगर: भरधाव कारने रस्ता ओलांडत असलेल्या पायी जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारात रविवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
गोविंद लूमा मधे (वय ६५, रा.खळमाळ,बोटा) हे बोटा येथील गावंदरा ओढ्याकडे अंघोळीसाठी जात होते. याच दरम्यान नाशिक कडून पुण्याकडे जाणाऱ्या कारने (क्र. एम एच १५, एच. क्यू. ४०४७) जोराची धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
याप्रकरणी घरगाव पोलीस ठाण्यात कार चालक त्रिंबक नामदेव सानप (रा.श्रमिकनगर सातपुर रोड, नाशिक ) याच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख करीत आहेत.