कॅन्टोमेंट बोर्डाची भरती प्रक्रिया रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2017 14:25 IST2017-05-12T14:25:03+5:302017-05-12T14:25:03+5:30
अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्डाने विविध २४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती़ मात्र, या प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या़

कॅन्टोमेंट बोर्डाची भरती प्रक्रिया रद्द
आॅनलाईन लोकमत
भिंगार (अहमदनगर), दि़ १२ - अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्डाने विविध २४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती़ मात्र, या प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या़ त्यामुळे या कॅन्टोमेंट बोर्डाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश नवी दिल्ली येथील रक्षा भूमी विभागाच्या प्रधान संचालकांनी काढले आहेत़
आॅक्टोबर २०१६ मध्ये कॅन्टोमेंट बोर्डाने लिपीक, चालक, गवंडी, प्लंबर, सफाई कामगार, मजदूर अशा २४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती़ या भरती प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या़ कॅन्टोमेंट बोर्डात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात एका अधिकाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते़ त्यानंतर कॅन्टोमेंट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही भरती प्रक्रियाच रद्द करुन पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश गुरुवारी दिले़