सीए विजय मर्दा दुसऱ्या डॉक्टरांच्या गुन्ह्यात अडकला!
By अण्णा नवथर | Updated: December 20, 2023 16:36 IST2023-12-20T16:36:32+5:302023-12-20T16:36:48+5:30
डॉ. शेळके याने तीन डॉक्टरांची एकूण १७ कोटी २५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

सीए विजय मर्दा दुसऱ्या डॉक्टरांच्या गुन्ह्यात अडकला!
अहमदनगर: शहर सहकारी बँकेतील बोगस कर्ज प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. निलेश शेळके याचा सीए विजय मर्दा याला दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आलं आहे. त्याला गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
शहर सहकारी बँकेत बनावट कर्ज प्रकरणे करून फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. निलेश शेळके याचा सीए विजय मर्दा याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. याप्रकरणी वेगवेगळे तीन गुन्हे दाखल असून, डॉ. शेळके याने तीन डॉक्टरांची एकूण १७ कोटी २५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यातील डॉ.रोहिणी सिनारे यांच्या नावे मंजूर करण्यात आलेल्या बोगस कर्ज प्रकरणी मर्दा हा अटकेत होता. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे त्याला सह दिवाणी न्यायाधीश व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.बी. रेमणे यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यांनी मर्दा याला सिनारे यांच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावताना शहर सहकारी बँकेतीलच दुसऱ्या प्रकरणात वर्ग करण्याचा आदेश दिला.
सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. पी. आर. जासूद यांनी बाजू मांडली.