१२१ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका
By Admin | Updated: July 7, 2016 23:23 IST2016-07-07T23:20:12+5:302016-07-07T23:23:57+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील १२१ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असणाऱ्या १५३ सदस्य पदासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोट निवडणुका होणार आहेत.

१२१ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका
अहमदनगर : जिल्ह्यातील १२१ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असणाऱ्या १५३ सदस्य पदासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोट निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचा भाग म्हणून १२ जुलैपासून निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात आलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने लवकर होणाऱ्या १२१ ग्रामपंचायत हद्दीतील पोट निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शक सूचना आल्या आहेत. यात वेगवेगळ्या कारणामुळे रिक्त असणाऱ्या १५३ ग्रामपंचायत सदस्यांच्या पदासाठी निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यासाठी आधी मतदार याद्या अद्ययावत करण्यात येणार आहेत. यात मतदार यादी ग्राह्य धरणे, निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात आलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणे, त्यावर हरकती व सूचना घेणे, मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम १९५९ मधील नियम ३ चे पोटनियम (५) नुसार मतदार यादीची जाहीर नोटीस प्रसिध्द करून अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया २५ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.