बस- दुचाकीच्या अपघातात तरूण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:39 IST2019-06-15T16:38:02+5:302019-06-15T16:39:29+5:30
शिवशाही बस आणि दुचाकी यांच्यामध्ये अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना पुणे - नाशिक महामार्गावर आळेफाटा परिसरात घडली.

बस- दुचाकीच्या अपघातात तरूण ठार
बोटा : शिवशाही बस आणि दुचाकी यांच्यामध्ये अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना पुणे - नाशिक महामार्गावर आळेफाटा परिसरात घडली.
शुक्रवारी रात्री साडेआठच्या वेळी दीपक गोविंद भले (वय - 22) व सुखदेव सीताराम दुधवडे (वय 26 दोघे रा बोटा माळवाडी) हे दुचाकी (क्रमांक एम एच ए डी 7841) वरून आळेफाटा येथून माळवाडीकडे चालले होते. दरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरून नाशिकहून वेगाने येणा-या शिवशाही बसने
(क्रमांक एम. एच. 04, एच. वाय. 9782) आळेफाटा परिसरात दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दीपक भले जागीच ठार झाला तर सुखदेव दुधवडे जखमी झाला. महादू भले यांच्या फियार्दीवरून आळेफाटा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.