जामखेडमध्ये घरफोडी : वडील आणि मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 10:43 IST2018-07-20T10:43:07+5:302018-07-20T10:43:24+5:30
जामखेड तालुक्यातील जमधरवाडी येथील वीर वस्तीवर चोरट्यांनी दोघांना जबर मारहाण केली. यामध्ये वडील व मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

जामखेडमध्ये घरफोडी : वडील आणि मुलगा जखमी
जामखेड : जामखेड तालुक्यातील जमधरवाडी येथील वीर वस्तीवर चोरट्यांनी दोघांना जबर मारहाण केली. यामध्ये वडील व मुलगा जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आतून कडी उघडून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर घरातील महिलेच्या गळ््यातील दागिने हिसकावले. यादरम्यान घरात उचकापाचक करत असताना गणेश भाऊसाहेब वीर व भाऊसाहेब वीर यांना जाग आली. जाग आल्यानंतर प्रतिकार करत असताना चोरट्यांनी दोघांवर हल्ला केला.गणेश वीर याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले तर भाऊसाहेब वीर यांना तोंडावर मारहाण करण्यात आली. सविता वीर यांच्या गळ््यातील दहा हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेले. याबाबत गणेश वीर यांना जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.